नवी दिल्ली : ५००, १०००च्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर पेटीएमवरुन एका दिवसात तब्बल १२० कोटी ७० रुपयांची व्यावसायिक व्यवहार झाल्याचा दावा कंपनीने केला असून लाखो ग्राहकांनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर खरेदीसाठी पेटीएम आणि ऑनलाईन माध्यमांचा आधार घेतला.
याबाबत पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार, ४.५ कोटी ग्राहकांनी गेल्या दहा दिवसात पेटीएमचा आधार घेतला. शिवाय, जवळपास ५० लाख नव्या ग्राहकांनी पेटीएमचा वापर सुरु केला. आजच्या घडीला पेटीएमचे एकूण १५ कोटी यूझर्स आहेत. पेटीएमचे उपाध्यक्ष सुधांशू गुप्ता यांनी सांगितले, मेट्रो शहरांमध्ये ग्राहक एक कप कॉफीसाठीही पेटीएमचा वापर करत आहेत, तर खेड्यांमध्ये शेतकरी बियाणे खरेदीसाठीही पेटीएम वापरत आहेत. पेटीएमची वाढ होताना आम्ही पाहत आहोत. ग्राहक आणि व्यापारी असो दोन्ही वर्ग पेटीएम वापरत असून, या माध्यमातून त्यांचे व्यवहारही नीट होण्यास मदत होते आहे.