येथे भरतो उपवर मुलींचा बाजार

bajar
बाजारात जायचे आणि आपल्याला पसंत पडेल ती मुलगी पत्नी म्हणून विकत घ्यायची ही कल्पना कुणालाच रूचणारी नाही. मात्र बुल्गारिया देशात दर तीन वर्षातून एकदा असा उपवर मुलींचा बाजार भरतो व तेथे बायको विकत घेता येते. हा बाजार पूर्णपणे कायदेशीर असून गेली अनेक वर्षे ही परंपरा या देशात आहे. स्टारा जागोर या ठिकाणी हा बाजार भरतो. अर्थात यात सामील होणार्‍या मुली आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांचे लग्न करून देण्यास पालकांना अडचणी येतात अश्या असतात. विशेष म्हणजे वधू पोशाख घालूनच मुली या बाजारात येतात.

या बाजारात सर्व वयोगटीतील मुली, महिला असतात पण त्या एकट्या येत नाहीत तर त्यांच्या कुटुंबियांसोबत येतात. बाजारात बायको निवडायला आलेली मुलेही त्यांच्या कुटुंबांसह येतात.एखादी मुलगी आवडली की मुलगा तिच्याबरोबर संभाषण करतो व पटले तर ठरलेली रक्कम मोजून या मुलीशी लग्न करून तिला घरी नेतो. एकदा का मुलाने मुलगी पसंत केली की त्याच्या कुटुंबियांना तिचा सून म्हणून स्वीकार करावाच लागतो कारण तसा येथे नियमच आहे.

हा बाजार कलाईदझी समाजाच्या लोकांसाठीच असतो व या समुदायाशिवाय बाहेरचे कोणी येथे येऊ शकत नाही तसेच या मुलींची लग्नेही बाहेरच्या समुदायातील मुलांशी केली जात नाहीत.

Leave a Comment