बजाजची नवी डोमिनर ४०० बाईक डिसेंबर मध्ये येणार

dominar
बजाज ने त्यांच्या पुण्याजवळच्या चाकण येथील प्रकल्पात डोमिनर ४०० या नव्या मोटरबाईकचे उत्पादन सुरू केले असून डिसेंबरच्या मध्यात ही बाईक बाजारात दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आत्तापर्यंत आलेल्या बजाजच्या बाईकमध्ये ही सर्वात पॉवरफुल बाईक आहे. शुक्रवारी कंपनीतील महिला इंजिनिअर असेंब्लीवर या बाईकचे युनिट तयार केले गेल्याचेही सांगितले जात आहे. ही बाईक ऑटो एक्स्पो २०१४ मध्ये सादर केली गेली होती त्यावेळी ती पल्सर सीएस ४०० नावाने सादर केली गेली होती.

डोमिनर केएमटी ड्यूक ३९० वरून प्रेरणा घेऊन बनविली गेली आहे. या बाईकला ३७३.३ सीसीचे सिंगल सिलींडर इंजिन दिले गेले असून इंजिन ट्रीपल स्पार्क टेक्नॉलॉजीसह आहे. सहा स्पीड गिअरबॉक्सही दिला गेला आहे. या बाईकसाठी अनेक नांवे विचारात घेतली गेली होती पण अखेर डोमिनर हे नांव पक्के केले गेले आहे. या बाईकची किंमत १.६ ते १.८ लाखांदरम्यान असेल असे संकेत दिले गेले आहेत.

Leave a Comment