स्नॅपड्रॅगन ८३५ मुळे बॅटरी बॅकअप समस्या सुटणार

prosessor
प्रोसेसर कंपनी क्वालकॉमने नेक्स्टजनरेशन मोबाईल चिपसेट स्नॅपड्रॅगन ८३५ बाजारात आणण्याची तयारी पूर्ण केली आहे. या प्रोसेसरला क्विक चार्ज टेक्नॉलॉजीचीही जोड दिली गेली असल्याचे कंपनीने जाहीर केले असून स्मार्टफोनची बॅटरी वारंवार चार्ज करावी लागण्याची समस्या यामुळे संपुष्टात येणार असल्याचा दावाही केला आहे. या प्रोसेसरमुळे स्मार्टफोनची बॅटरी पाच मिनीटात चार्ज होणार आहे व या चार्जिंगवर पाच तास फोन वापरता येणार असल्याचे सांगितले जात आहे.

या नव्या प्रोसेसरसोबत कंपनीने फोर जनरेशन सुपरफास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी क्विक चार्ज फोर सादर केली आहे. पुढच्या वर्षांच्या पहिल्या सहामाहीत हे तंत्रज्ञान ग्राहकांना उपलब्ध होणार आहे व स्नॅपड्रॅगन ८३५ या क्वीक चार्ज फोरसह उपलब्ध करून दिले जाणार असल्याने क्विक चार्ज तंत्रज्ञानाची वेगळी खरेदी करावी लागणार नाही असे कंपनीचे वरीष्ठ संचालक एवरेट रोच यांनी सांगितले.

कंपनीतर्फे नुकत्याच केल्या गेलेल्या रिसर्चमध्ये ६१ टक्के स्मार्टफोन युजरनी फास्ट चार्जिंगला प्राधान्य दिले आहे. शिवाय या प्रोसेसरमध्ये बॅटरी ओव्हर चार्ज होऊ नये अथवा ओव्हर हिटींग होऊ नये यासाठी सुरक्षा उपायही केले गेले आहेत. यासाठी चार पातळीवर प्रोटेक्शन दिले जाणार आहे. यामुळे स्मार्टफोन बॅटरी सध्याच्या पेक्षा ५ टक्के अधिक थंड राहिलच पण २० टक्के अधिक वेगाने चार्जही होणार आहे. परिणामी सध्या पाच तासांच्या फोन वापरासाठी चार्जिंगला लागणारा अर्धा ते एक तासाचा वेळ अवघ्या ५ मिनिटांवर येणार आहे.

Leave a Comment