वर्ष २०१७मध्ये सुट्यांची लयलुट

holiday
मुंबई – २०१६ साल आता अवघ्या काही दिवसात संपणार आहे. त्यानंतर येणारे २०१७ हे साल कसे असेल याची उत्सुकता प्रत्येकालाच असल्यामुळे २०१७ मध्ये कोणता सण कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला येणार याबाबत प्रत्येकालाच जाणून घ्यायला आवडते.

२०१७ हे वर्ष २०१६ प्रमाणे तुम्हाला अधिक आनंद देऊन जाणार आहे. २०१७ मध्ये पहिली सुट्टी येते ती मकर संक्रांतीची. ही मकर संक्रांत १४ जानेवारीची शनिवारी येणार आहे. त्यानंतर जानेवारीतील चौथ्या आठवड्यात येणारा प्रजासत्ताक दिन गुरूवारी येणार आहे. याचा फायदा असा होईल की ज्या लोकांना सलग चार दिवस सुट्टी हवी आहे. त्यांनी फक्त शुक्रवारी सुट्टी घेऊन शनिवार, रविवार जोडून घ्यायचा आहे.

यंदा २४ फेब्रुवारीला महाशिवरात्री येणार असून त्या दिवशी शुक्रवार आहे. तसेच १३ मार्चला होळी असून त्या दिवशी सोमवार आहे आणि सोमवारची सुट्टी किती महत्वाची असते हे तुम्ही सारे जाणताच. त्यानंतर कर्नाटकचा नवीन वर्ष उगाडी हा सण मंगळवारी येणार आहे. मार्च महिन्यांत लांब विकेंड असलेल्या सुट्टया कमी मिळतात. मात्र २०१७ मध्ये ही संधी आयती मिळणार आहे. एप्रिल महिन्यात गुड फ्रायडे असून या दिवशी आंबेडकर जयंती देखील आहे.

तसेच १ मे ला येणारा कामगार दिन देखील सोमवारी येणार आहे. ऑगस्ट महिन्यात दोन लांब विकेंड आहेत. जर तुम्ही १४ ऑगस्टला सुट्टी घेतली तर तुम्हाला १२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या चार दिवसांचा लांब विकेंड मिळू शकतो. तसेच २५ ऑगस्टला गणेश चतुर्थी असून त्या दिवशी शुक्रवार आहे. त्यानंतर येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी देखील भरपूर सुट्या आहेत. त्यावेळी तुम्हाला ३ सुट्टया घेऊन १० दिवसांचा लांब विकेंड साजरा करायचा आहे. २९ सप्टेंबरला अयुधा पूजा, ३० सप्टेंबरला विजयादशमी आणि २ ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. या आठवड्यात जर तुम्ही ३, ४ आणि ६ या दिवशी सुट्टी घेतलात तर तुम्हाला मोठा विकेंड मिळेल.

Leave a Comment