नोटबंदीचा सेकंडहँड कार मार्केटला फटका

used-cars
नोटबंदीचा विपरित परिणाम देशातील सेकंड हँड कार मार्केटला बसला असल्याचे या व्यवसायातील डिलर्स सांगत आहेत. नोटबंदीचा निर्णय अचानक जाहीर करण्यात आल्याने अनेक ग्राहकांनी सध्या सेकंडहँड कार खरेदी थांबविली आहे अथवा कांही जण जुन्या नोटा खपविण्यासाठी कॅशने पैसे देण्याची तयारी दाखवित आहेत. अर्थात डिलर्सनी जुन्या नोटा घेण्यात येणार नसल्याचे जाहीर करून टाकले आहे पण त्यामुळे व्यवसाय खूपच कमी होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

जुन्या कार विक्रीसंदर्भात बोलताना एक डिलर म्हणाला, जुन्या कार फार काळ ठेवता येत नाहीत त्यामुळे आम्हाला नफा कमी घेऊनही त्या विकल्या पाहिजेत. त्यात आता वर्षअखेर आहे. वर्ष पालटले की जुन्या कारचे व्हॅल्यूएशन कमी होते कारण ती आणखी वर्षाने जुनी होते. यामुळे आमच्या व्यवसायात २० ते ३० टक्के घट झाली आहे. जुन्या दुचाकींचा व्यवसाय तर ठप्पच झाला आहे. नव्या नोटा चलनात येईपर्यंत परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही.

भारतात नव्या कारपेक्षा सेकंडहँड कार मार्केट मोठे असून दर महिना साधारण ३ लाख जुन्या कार विकल्या जातात. यात असंघटीत क्षेत्र ७५ टक्के आहे तर संघटीत व्यवसाय २५ ट्कके आहे.

Leave a Comment