नव्या वर्षात नोकिया स्मार्टफोनचे पुनरागमन होणार

nokia
नोकिया स्मार्टफोन व्यवसायात पुन्हा येणार याचे अनेक संकेत मिळत असून पुढच्या वर्षी म्हणजे २०१७ च्या फेब्रुवारीत त्यांचे नवे स्मार्टफोन बाजारात दाखल हेातील असे समजते. गेले कांही दिवस नोकियाचे अँड्राईड ५३२०,१४९० व नोकिया डी १ सी ची झलक साईट गीक बेंचवर मिळते आहे मात्र कंपनीने या बाबत अधिकृत खुलासा अद्याप केलेला नाही. कंपनीचे सीईओ राजीव सुरी फेब्रुवारीत होत असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१७ मध्ये भाषण करणार आहेत त्यावेळी कदाचित फोन लॉचिंगची घोषणा केली जाईल असे समजते.

अर्थात हे फोन नोकिया ब्रँडखाली बनविले जाणार असले तरी ते एचएमडी ग्लोबल या फिनलंड येथील कंपनीत तयार केले जातील. यावर्षाच्या सुरवातीलाच नोकियाने या कंपनीशी १० वर्षे नोकिया ब्रँड फोन बनविण्यासंदर्भातला करार केला आहे. नोकिया डी १सी नव्या वर्षात सादर केला जाईल. त्याला ३ जीबी रॅम,१३ एमपीचा रियर, ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल असेही समजते.

Leave a Comment