बाजारात आल्या चायना मेड २००० आणि ५०० रुपयांच्या नोटांचे पर्स

note
चेन्नई – चीन नेहमी विविध फॅन्सी, आकर्षक वस्तू बनवण्यात अग्रेसर आहे. चीनी वस्तूंच्या विरुध्द देशात वातावरण असताना चीन बनवलेल्या पर्सने देशातील नागरिकांना थक्क करत ग्राहकांना परत आपल्या कलाकृतीकडे आकर्षित केले आहे. चलनातून ५०० आणि १००० च्या नोटाबंद झाल्यानंतर देशात पैशाचा तुटवडा निर्माण झाला. हा तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारने २०००ची नोट चलनात आणली असून नवीन ५०० ची नोटही आणणार असल्याचे सांगितले.

परंतु यापुढे जात चीनने बाजारात ५००ची नोट येणाच्या आधीच या नोटांचे ठसे असलेले पर्स बनवल्या आहेत. या पर्स चेन्नईमधील टीनगर आणि पंडी बाजार येथील फॅन्सी दुकानांवर या पर्स विक्रीसाठी दिसत आहेत. आपल्या या कलाकृतीने चीनने भारतातील ग्राहकांना आकर्षित केले आहे.

Leave a Comment