खोटे वृत्त पसरवणा-यांची दखल घेणार फेसबुक

facebook
न्यूयॉर्क – फेसबुकवरुन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवेळी अनेक खोट्या बातम्या नेटीझन्समध्ये व्हायरल होत होत्या. फेसबुकवरुन व्हायरल होणाऱ्या या खोट्या बातम्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना प्राधान्य देण्यात येत होते. यावरुन बराक ओबामा यांनी फेसबुकवर टीका केली होती. याची गंभीर दखल मार्क झुकेरबर्गने घेतली आहे.

मार्क झुकेरबर्गने फेसबुकवरुन असे खोटे वृत्त पसरू नये, यासाठी आम्ही पाऊले उचलणार आहोत, असे एका पोस्टद्वारे जाहीर केले आहे. लोकांना अचूक माहिती हवी असते. आम्ही पण यावर बऱ्याच काळापासून काम करत असून याकडे गंभीरतेने पाहात आहोत, असे ते म्हणाले. आमच्या फेसबुक जाहिरातीचे माध्यम वापरुन खोट्या वृत्त पसरविणाऱ्या संकेतस्थळांवर बंदी घालण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे ही मार्क झुकेरबर्गने सांगितले.

Leave a Comment