मुलाचे नांव नोटबंदी ठेवण्याचा सल्ला

misa
दिल्ली- हिवाळी अधिवेशनात आपल्या दोन महिन्याच्या मुलाला घेऊन हजर झालेल्या राज्यसभेच्या खासदार व राजदचे प्रमुख लालूप्रसाद यांच्या कन्या डॉ. मिसा भारती सध्या चर्चेत आहेत. ही चर्चा प्रामुख्याने त्यांच्या दोन महिन्याच्या मुलासंदर्भातच सुरू असून या मुलाचे नामकरण अद्यापी केले गेलेले नाही. या बाळाला पाहण्यासाठी खासदार गर्दी करत असून मुलाचे नांव काय ठेवावे याचे सल्लेही मिसाना देत आहेत..

कांही जणांनी डॉ.मिसा यांना मुलाचे नांव नोटबंदी ठेवण्याचा सल्ला दिला आहे तर कांही जणांच्या मते याचे नांव कॅश क्रंच ठेवले गेले पाहिजे. कांही जणांच्या मते या बाळाला संसद हेच नांव योग्य आहे कारण मिसा खासदार बनल्यावरच त्याचा जन्म झाला आहे. मिसाचे पती खासदार शैलेंद्र यांनी मात्र नोटबंदी नावावर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. या बाळाला पाहण्यासाठी मुलायमसिंग यांचे पुत्र खासदार तेजप्रतापसिंगही हजर झाले. तेजप्रताप यांच्याबरोबर मिसा यांची बहिण राजलक्ष्मी यांचा विवाह झाला आहे व या दोघी बहिणींनी एकाच दिवशी म्हणजे ७ सप्टेंबरलाच मुलांना जन्म दिला आहे.

डॉ. मिसा यांच्या नावासंदर्भातही अशीच घटना घडली होती. त्यावेळी आणीबाणी होती व लालूंना मिसा कायद्याखाली जेलमध्ये बंद केले गेले होते. तेव्हाच या मुलीचा जन्म झाला म्हणून तिचे नांव मिसा ठेवले गेले होते.

Leave a Comment