फॉक्सवॅगन करणार कर्मचारी कपात

volkswagen
वुल्फ्सबर्ग – २०२१पर्यंत ३०हजार कामगार कपात करण्यास फॉक्सवॅगन या जर्मन कार निर्माता कंपनी आणि कामगार संघटनांमध्ये सहमती झाली असून कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक आणि सेल्फ ड्रायव्हिंग कार प्रकारात गुंतवणूक करण्यास चालना मिळणार आहे, असे सांगण्यात आले आहे. जर्मनीमध्ये २३ हजार कर्मचा-यांची कपात करण्यात येईल. यामुळे प्रतिवर्षी ३ लाख ८ हजार कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होईल. ६,१०,०७६ कामगार असणा-या कंपनीने याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र इलेक्ट्रिक प्रकारातून ९ हजार नव्या नोक-या निर्माण होणार आहेत. प्रदुषण प्रकरणी घोटाळासमोर आल्याने युरोपातील सर्वात मोठय़ा ऑटोमेकर कंपनीला आपल्या सर्वात मोठय़ा प्रकल्पात वाढत्या किमतीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

Leave a Comment