ट्रम्प समुहाचा आणखी एक प्रकल्प पुण्यात

trump-orgnaisation
नवी दिल्ली – भारतातील आपली हिस्सेदारी वाढविण्याच्या प्रयत्नात अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड टॅम्प यांची रियल इस्टेट कंपनी असून कोलकातामध्ये निवासी प्रकल्प उभारण्यासाठी युनिमार्क ग्रुपबरोबर ट्रम्प यांची मालकी असणारी ट्रम्प ऑर्गनायझेशन या न्यूयॉर्कस्थित रियल इस्टेट कंपनीने करार केला आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील पुणे शहरात दुसरा प्रकल्प उभारण्यासाठी त्यांच्या कंपनीबरोबर बोलणी सुरु आहेत. देशातील प्रमुख शहरात कार्यालयांसाठी प्रकल्प उभारण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

कोलकातामध्ये ट्रम्प टॉवरच्या सहाय्याने ४ लाख चौरस फूट जागेत निवासी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे सध्या डिझाईन सुरू असून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा प्रकल्प सादर होण्याची शक्यता असून यामध्ये २,५०० चौरस फूट वर्गाचे युनिट्स माफक किमतीत आणण्यात येणार असल्याचे कल्पेश मेहता यांनी सांगितले. युनिमार्क ग्रुपचे सहसंस्थापक हर्ष पतोडिया यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

खराडी भागात पुणेस्थित पंचशील रियल्टीबरोबर ट्रम्प ऑर्गनायझेशन दुसरा प्रकल्प सुरू करणार आहे. या ठिकाणी चार टॉवर उभारण्यात येणार असून हा प्रकल्प ५ लाख चौरस फूट जागेत उभारण्यात येईल. यापूर्वी संयुक्तरित्या कल्याणी नगर येथे दोन टॉवर उभारण्यात आले होते. भारतात प्रीमियम युनिट्स ३.५ ते १५ कोटी रुपये या दराने विक्री केली जाते. कंपनीने अगोदरच मुंबई, गुरगाव या ठिकाणी स्थानिक भागिदारांबरोबर प्रकल्प उभारले आहेत.

Leave a Comment