रिलायन्सचे इंटरनॅशनल कॉलिंग ऍप

reliance
मुंबई – रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या मालकीच्या रिलायन्स ग्लोबल कॉलने आंतरराष्ट्रीय कॉलिंग ऍप सादर केले असून आंतरराष्ट्रीय कॉल या ऍप्लिकेशनच्या सहाय्याने करता येईल. टोल फ्री अथवा पिन क्रमांक या कॉलसाठी डायल करण्याची आवश्यकता भासणार नाही. कंपनीच्या ऑफरनुसार पहिल्यांदा वापरणा-यांना १०० रुपयामध्ये २०० रुपयांचे बोलता येईल. या ऍपने कॉल करणा-यांना १.४ रुपये प्रतिमिनीट या दराने शुल्क आकारण्यात येणार आहे. देशातील सर्व पोस्टपेड आणि प्रीपेड, लॅन्डलाईन सेवांवर ही सुविध उपलब्ध करण्यात येणार आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

1 thought on “रिलायन्सचे इंटरनॅशनल कॉलिंग ऍप”

Leave a Comment