मेघालयात होणार देशातला पहिला चेरी महोत्सव

cherry
मेघालयात देशातला पहिला वहिला चेरी महोत्सव साजरा केला जाणार आहे. जपानमध्ये चेरी ब्लॉसम फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व तेथे त्याला साकुरा असे म्हटले जाते. या दिवसांत जपानमध्ये पर्यटक प्रचंड संख्येने साकुरा पाहण्यासाठी बाहेर पडतात. जपानमध्ये हा महोत्सव एप्रिलमध्ये साजरा होतो कारण त्यावेळी तेथे चेरीची झाडे फुलांनी बहरतात.

हिमालयाच्या पहाडी भागात चेरीची झाडे पानगळीच्या दिवसांत म्हणजे थंडीत फुलतात. यावेळी झाडांवर पाने राहातच नाहीत तर सारे झाड चेरीच्या नाजुक गुलाबी पांढरट फुलांनी डवरलेली असतात व अशी शेकडो झाडे एकचवेळी पाहणे हा नयनोत्सव असतो. शिलाँगमध्ये चेरीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली गेली आहे.१९८० मध्ये प्रथमच वन विभागाने चेरी लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. आता ही झाडे मोठी झाली आहेत.

शिलाँगच्या वॉर्ड सरोवराजवळ हा चेरी महोत्सव साजरा केला जाणार असून त्यात फूड, फॅशन शो, तिरंदाजी, रॉक कॉन्सर्ट यांचाही समावेश आहे. देशातून या महोत्सवासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. चेरीची ही फुले अ्रगदी नाजूक असतात व उमलली की दुसर्‍याच दिवशी ती गळून पडतात त्याचा सडा झाडांखाली पसरलेला दिसतो.

Leave a Comment