एटीएम आणि बँकांबाहेरील रांगा कमी करण्यासाठी सरकारचा नवा प्रयत्न

debit-card
आता पेट्रोल पंपावरही पैसे काढता येणार

मुंबई – एटीएम आणि बँकांबाहेरील रांगा नोटबंदीच्या निर्णयानंतर वाढत असून सरकारने त्या रांगा कमी करण्यासाठी नवी घोषणा केली आहे. आता देशातील काही ठराविक पेट्रोलपंपावर २ हजारांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. सुरूवातीला अडीच हजार पेट्रोल पंपावर ही सुविधा सरकारने सुरू केली असून हा निर्णय नागरिकांच्या हिताचा आहे.

पेट्रोल पंपावर २००० पर्यंत रक्कम काढता येणार आहे. आरबीआय आणि एसबीआय संयुक्तपणे ही मोहीम राबविणार आहे. ज्या पेट्रोल पंपावर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पीओएस (कार्ड स्वाईप मशीन) आहेत. तिथेच ही सुविधा असणार आहे. सुरुवातीला २५०० पेट्रोल पंपावर पैसे काढता येणार आहे. आपले एटीएम कार्ड स्वाईप केल्यानंतर पेट्रोल पंपाकडून तुम्हाला दोन हजारापर्यंतची रक्कम मिळू शकते. यानंतर ही सुविधा आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बँकांची पीओएस असलेल्या पंपावरही ही सुविधा सुरु होणार आहे.

ही सुविधा रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरु केली आहे. त्याचबरोबर २४ नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंपावर ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे एटीएम बाहेरच्या रांगा काही प्रमाणात कमी होतील.

Leave a Comment