विवोचा फ्लॅगशीप एक्सप्ले सिक्स ६ जीबी रॅमसह

vivo
विवोने त्यांच्या एक्सप्ले सिरीजमधील नवा फ्लॅगशीप विवो एक्सप्ले सिक्स चीनमध्ये लाँच केला असून या फोनची किंमत ४४९८ युआन म्हणजे ४४५०० रूपये आहे. १२ डिसेंबरपासून तो ऑफलाईन व ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. गोल्ड व गोल्ड रोज अशा दोन कलरमध्ये तो उपलब्ध केला गेला आहे.

या फोनसाठी ५.४ इंची क्यूएचडी सुपर एमोलेड ड्युअल कर्व्हएज डिस्प्ले दिला गेला आहे. ग्राफिक्ससाठी एड्रेनो ५३० जीपीयू असलेल्या या फोनला ६ जीबी डीडीआर ४ रॅम, १२८ जीबी स्टोरेज, फुल मेटल युनिबॉडी, अॅड्राईड मार्शमेलो ६.० वर आधारित फनटच ३.० ओएस दिली गेली आहे. ड्युअल सिम, फोर जी व्होल्ट सपोर्ट, ४०८० एमएएच ची क्विक चार्ज टेकसहची बॅटरी अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.

या फोनसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह दिला गेला आहे.फोर अॅक्सिस ओआयएस, सोनी सेन्सर अपर्चर एफ/१.७, १२ एमपी प्रायमरी व ५ एमपीचा सेकंडरी रियर कॅमेरा तर १६ एमपीचा अपर्चर एफ/२.० सह फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. फिंगरप्रिंट सेन्सरही दिला गेला आहे.

Leave a Comment