जिवलगांची आठवण कायम ठेवणारे हिरे

ashes
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देश व जग ज्या वेगाने बदलत चालले आहे ते पाहिले की थक्क व्हायला होतेच. कल्पनाही करता येणार नाही अशी अनेक कामे तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्षात आलेली पाहता येत आहेत. अल्गोरडांझा नावाची एक कंपनी असेच आगळेवेगळे तंत्र प्रत्यक्षात आणत आहे. अल्गोरडांझा या शब्दाचा अर्थच आहे आठवण. ही कंपनी मृत व्यक्तींच्या शरीराच्या राखेपासून हिरे बनवून देते व आप्त आपल्या जिवलगाची ही आठवण जीवापाड जपत आहेत.

या कंपनीचा कारभार स्वित्झर्लंड, जर्मनी व ऑस्ट्रीया या तीन देशांत आहे. कंपनीचा मालक रिनाल्डो विल्ली याला ही कल्पना शाळेत असतानाच सुचली होती. शाळेत त्याच्या शिक्षकांनी भाज्यांच्या राखेपासून मौल्यवान हिरे कसे बनू शकतात त्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते व तेव्हापासून त्याच्या मनात आपल्या जिवलगांच्या राखेपासूनही हिरे बनू शकतील व ते त्यांची आठवण म्हणून वापरता येतील असा विचार सुरू होता. तो या कंपनीच्या रूपाने प्रत्यक्षात आला आहे. हे हिरे सिंथेटिक आहेत मात्र खरे व या सिंथेटिक हिर्‍यात फारच मामुली फरक आहे. ही कंपनी वर्षात असे ८५० हिरे बनवू शकते.
——-