एक हजाराची नवी नोट नाही- अरूण जेटली

jetley
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी एक हजाराची नवी नोट सरकार चलनात आणणार नसल्याचे जाहीर केले आहे. नोटा बंदी निर्णयानंतर सरकारने २ हजार व पाचशेच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत व १ हजाराची नोटही पुन्हा चलनात आणली जाईल असे पूर्वी सांगितले जात होते मात्र त्यावर जेटली यांनी हा खुलासा केला आहे. तसेच जगातील सर्वात मोठे करन्सी रिप्लेसमेंट अभियान कोणत्याही परिस्थितीत सरकार मागे घेणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नव्या नोटांसाठी आवश्यक असलेले बदल एटीएममध्ये करण्याचे काम यद्धपातळीवर सुरू असून आत्तापर्यंत २२५०० एटीएमचे ट्रे बदलाचे काम पूर्ण झाले आहे व आठवड्यात आणखी १ लाख एटीएम कार्यरत होतील असे सांगून ते म्हणाले, लग्नसमारंभासाठी संबंधित व्यक्ती बँकेतून अडीच लाख रूपयांपर्यंतची रक्कम काढू शकणार आहेत तसेच शेतकर्‍यांसाठीही कांही सुट दिली जाणार आहे. सरकार परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून असल्याचेही जेटली म्हणाले.

Leave a Comment