बंद असलेल्या पीएफ खात्यांवर मिळणार ८.८ टक्के व्याज

epfo
नवी दिल्ली – कामगार मंत्रालयाने निष्क्रिय ईपीएफ खात्याची व्याख्या बदलत या सर्व खात्यांवर व्याज देण्याचा निर्णय घेतला असून गेल्या ३६ महिन्यापासून जी खाती वापरात नाहीत, त्यांना निष्क्रिय असे समजण्यात येते. या खात्यांवर आतापर्यंत व्याज देण्यात येत नव्हते. नव्या नियमानुसार निष्क्रिय खात्यामध्ये सलग ३६ महिन्यापर्यंत कोणतीही रक्कम जमा करण्यात आली नाही, तरी त्या खात्यात आपोआप ८.८ टक्के व्याज मिळत राहणार आहे.

याबाबत कामगार मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार, कोणताही व्यक्ती बेरोजगार असेल तरी त्याच्या खात्यामध्ये व्याज जमा होईल. या सदस्याला तोपर्यंत व्याज मिळत राहणार आहे, जोपर्यंत ती व्यक्ती खात्यातील रक्कम काढण्यासाठी अर्ज करत नाही अथवा अन्य कोणत्या ठिकाणी नोकरी सुरू करत नाही. नव्या नोकरीवर कामाला लागताच सदस्याच्या पीएफ खात्यावर कंपनीकडून पैसे जमा करण्यात येईल.

सध्या असणा-या निष्क्रिय खात्यावर ८.८ टक्के व्याज मिळत राहणार आहे. ईपीएफ खात्यामध्ये सदस्य आपल्या गरजेप्रमाणे निधी गोळा करू शकतात. मात्र सरकारकडून जोपर्यंत व्याज मिळत राहणार आहेत, तोपर्यंत अनेक सदस्य आपल्या खात्यातून पैसे काढणार नाही. ही गुंतवणूक सुरक्षित राहणार आहे. संघटनेच्या या सदस्यांना आज अथवा उद्या त्यांच्या खात्यातील रक्कम द्यावी लागणार आहे, असे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

Leave a Comment