नव्या नोटा आठवड्याभरात एटीएममधून मिळणार

note1
नवी दिल्ली – नागरिक संपुर्ण देशामध्ये सध्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांच्या बाहेर रांगा लावताना दिसत आहेत. नागरिक दुपारच्या कडक उन्हातही बँका, एटीएम, पोस्ट ऑफीसबाहेर रांगा लावत आहेत. मात्र, आता नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण, येत्या आठवड्याभरात अधिकाधिक एटीएम मशीन्समध्ये ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.

पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटा देशातील निम्म्या एटीएममधून उपलब्ध होणार आहेत. सरकारकडून पाचशे रुपयांच्या नव्या नोटा छापण्यात आल्या आहेत. येत्या आठवड्याभरात देशभरातील निम्म्या एटीएममध्ये कॅलिब्रेशनची प्रक्रिया पार पडेल. यानंतर या एटीएममधून पाचशे आणि दोन हजारांच्या नोटा उपलब्ध होतील अशी माहिती सरकारने दिली आहे.

जास्तीत जास्त रोकड एटीएममध्ये उपलब्ध व्हावी, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आठवड्याभरात एटीएम मशीनमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. त्यानंतर देशातील निम्म्या एटीएममधून ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा मिळतील. वेगळ्या आकाराची दोन हजाराची नवी नोट आहे. सध्याच्या एटीएम मशीन्स या नव्या नोटांसाठी अनुकूल नाही. यामुळे या नोटांसाठी एटीएम मशीन अनुकूल कराव्या लागणार असुन त्यासाठी आठवडा लागणार आहे. म्हणजेच आठवड्यानंतर नागरिकांना आठवड्याभरानंतर एटीएम मशीन्समधून ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा उपलब्ध होतील.

Leave a Comment