स्वदेशी ड्रोन रूस्तम दोनचे उड्डाण यशस्वी

rustom
लढाऊ क्षमता असलेल्या स्वदेशी ड्रोन रूस्तम दोनचे पहिले उड्डाण बुधवारी यशस्वी ठरले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. बंगलोरपासून साधारण २५० किमीवर असलेल्या चित्रदुर्ग येथील एरॉनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये ही चाचणी घेतली गेली. दोन टन वजनाचे हे ड्रोन डीआरडीओने विकसित केले असून या ड्रोन च्या चाचण्या युवा संशोधकांच्या वेगळ्या टीमने घेतल्या. त्यात लढाऊ विमानाचे पायलटही सहभागी झाले होते असेही समजते.

मिळालेल्या या यशामुळे भारताने मानवरहित वायुयान क्षेत्राच्या विकास कार्यक्रमात नवी उंची गाठली असल्याचे मानले जात आहे. मध्यमउंचीवर हे ड्रोन २४ तासांपर्यंत उड्डाण करू शकते तसेच सशस्त्र दलाच्या टोही मिशनवरही ते पाठविता येणार आहे. या ड्रोन चे डिझाईन व विकास पूर्णपणे डीआरडीओमध्येच केला गेला आहे.

Leave a Comment