रिलायन्सचा नवा स्वस्तातला ४जी स्मार्टफोन लॉन्च

wind-7
नवी दिल्ली : लाईफ सीरीजचा विंड ७ आय हा नवा ४जी स्मार्टफोन रिलायन्स डिजीटलने लॉन्च केला असून ४ हजार ९९९ रुपये ऐवढी या फोनची किंमत ठेवण्यात आली आहे. या फोनसोबत ग्राहकांना दोन वर्षांची वॉरंटी मिळणार आहे.

सध्या हा फोन बाजारात ब्लॅक आणि ब्ल्यू या दोन कलर्समध्ये उपलब्ध आहे. रिलायन्स विंड ७ या ऑगस्टमध्ये लॉन्च केलेल्या स्मार्टफोनचे हे स्वस्त व्हर्जन आहे. विंड ७आय हा अँड्रॉईड ६.० मार्शमेलो सिस्टीम सपोर्टेड आहे. यामध्ये ५ इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. १.३ गीगाहर्ट्स क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१० प्रोसेसर, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटर्नल स्टोरेज, ८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि २२५०mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment