बँक खात्यातून लग्नासाठी काढता येणार अडीच लाख रूपये

shaktikant-das
नवी दिल्ली – नागरिकांची सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर होणारी गैरसोय लक्षात घेता गुरूवारी सरकारकडून अपवादात्मक परिस्थितीत बँक खात्यातून रक्कम काढण्यावरील निर्बंध शिथिल करण्यात आले असून नवी दिल्लीत केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली. आता नागरिकांना या निर्णयानुसार लग्नकार्यासाठी बँक खात्यातून अडीच लाखांची रक्कम काढता येणार आहे. त्यासाठी संबंधित खातेधारकाला बँकेत केवायसी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. मात्र, सरकारकडून ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बदलून घेण्याची मर्यादा आणखी कमी करण्यात आली आहे. १८ नोव्हेंबरपासून नागरिकांना बँकेत ४५०० रूपयांऐवजी फक्त २००० रूपये मुल्याच्याच नोटा बदलून मिळतील. या निर्णयामुळे नागरिकांची आणखी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment