‘ईबे’वर नव्या नोटांसाठी लाखोंची बोली

ebay1
नवी दिल्ली – नोटबंदीमुळे देशभरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून आपल्याकडील जून्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिक बँकेत रांगा लावत आहेत. तर तिकडे ‘ईबे इंडिया’ या ई-कॉमर्स वेबसाइटवर २००० रुपयांच्या नोटची किंमत चक्क १,५०,००० रुपये लावली आहे तर १००० रुपयांच्या नोटची किंमत तब्बल ३०,००,००० रुपये लावली जात आहे. त्यामुळे असाच दुर्मिळ नोटा जमविण्याचा छंद असलेले नागरिक तुमच्या नोटांना लाखो किंवा कोटी रुपयांत खरेदी करु शकतात. याचे उदाहरण ई-कॉमर्स वेबसाईट ईबे वर पहायला मिळत आहे.
ebay
चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर नागरिक आपल्याकडील नोटा बदली करण्यासाठी बँकेत गर्दी करत आहेत. त्याचवेळी ‘ईबे इंडिया’ वेबसाइटवर हजार आणि दोन हजार रुपयांच्या नोटांची किंमत लाखोंमध्ये लावली जात आहे. ७८६ हा अंक आपल्या देशातच नाही तर जगभरात अनेकजण शुभ अंक मानतात. तसेच बॉलिवूडचा बादशहा अमिताभ बच्चन याच्या दिवार चित्रपटातही बिल्ला नंबर ७८६ खुपच गाजला होता. ७८६ क्रमांक असलेल्या नोटा आपल्याकडे जमविण्याचा छंद अनेकांना आहे. हेच लक्षात घेवून एका व्यक्तीने ‘ईबे इंडिया’ या ई-कॉमर्स वेबसाइटवर ७८६ क्रमांक असलेल्या नोटा विक्रीस काढल्या आहेत.

तुम्हाला आरबीआयचे पूर्व गव्हर्नर रघुराम राजन यांचे हस्ताक्षर असलेली जुनी १००० रुपयांची नोट ३० लाख रुपये मिळवून देऊ शकते. ईबे वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ७८६ सिरीज असलेली १००० रुपयांची नोट विक्रीस काढली असून आतापर्यंत या नोटची किंमत ३० लाख रुपये लावण्यात आली आहे. या बोलीमध्ये सहभागी होण्यास २४ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे.

दोन हजारांच्या पाच नोट इबे या ई-कॉमर्स वेबसाइटवर विकण्यास काढल्या असुन त्यावर माहिती दिली आहे की, या ५ नोटांसोबत ५०० रुपयांची एक ७८६ क्रमांक असलेली नोट फ्री दिली जाईल. ही पहिलीच वेळ नाही की ईबे वेबसाइटवर भारतीय चनल अपलोड करुन त्यावर विक्रीसाठी बोली लावली जात आहे. यापूर्वीही १, १०, २०, १०० रुपयांच्या नोटा विकण्यासाठी लाखोंची बोली लावली गेली आहे.

Leave a Comment