७ हजार किमीवरील झिंबावेत चालतात भारतीय नोटा

zimbzbve
मोदी सरकारने चलनातून मोठ्या नोटा बंद करण्याचा जाहीर केलेला निर्णय भारतवासियांप्रमाणे अन्य देशांनाही अडचणीचा ठरला असला तरी भारतीय रूपयातून आजही अनेक देशांत प्रवास, निवास, जेवण, खरेदीसाठी व्यवहार करता येतात त्यात भारतापासून ७ हजार किमीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील झिंबावे या देशाचाही समावेश आहे. भारतीय रूपया येथे वैध चलन असून त्याचा सहज वापर करन्सी एक्स्चेंजच्या झंझटाशिवाय करता येतो आहे.

झिंबावेच स्वतःचे चलन आहे झिंबावे डॉलर.२०१४ मध्ये झिंबावे रिझव्हॅ बँकेने देशात चालणार्‍या आशियाई चलनात भारताच्या रूपयाचाही समावेश केला आहे. चीन व जपान या देशांनीही ट्रेडींग साठी भारतीय रूपयाला मान्यता दिलेली आहे. झिंबावेत रूपयाची किंमत १ रूपयाला ५.३४ झिबावे डॉलर्स अशी आहे. अर्थात झिंबावेमध्ये अमेरिकन डॉलर सर्वाधिक चालतात.

भारताचा शेजारी भूतान येथेही भारतीय रूपयाचा वापर भारतीय नागरिक करू शकतात. मात्र तेथे फक्त ५० व १०० रूपयांच्या नोटांतच व्यवहार करता येतात. नेपाळमध्येही भारतीय चलनाच्या १०० रूपयांखालील नोटा वैध मानल्या जातात मात्र या दोन्ही देशांत भारतीय ५०० व १००० रूंपयाच्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. नेपाळचे चलन आहे रूपैय्या. भारतीय १ रूपयाची किंमत तेथे १.६० नेपाळी रूपय्या इतकी आहे. भूतान नेपाळमध्ये राहणे, खाणे, प्रवास, शॉपिंग साठी भारतीय रूपये वापरता येतात.

Leave a Comment