‘७८६’ च्या मोहापायी अकलखाती जमा साडेचार लाख रुपये

currency1
जोधपूर – देशातील सामान्य लोकांपासून अतिमहत्वपूर्ण व्यक्तीही ५००-१००० च्या नोटबंदीनंतर त्रस्त आहेत. एवढेच नाही तर नोटबंदीने नोटा संग्रही ठेवणाऱ्या हौशी लोकांसाठीही संकट निर्माण केले आहे. नोटबंदीमुळे विशेष नंबरच्या नोटा संग्रहित करणाऱ्या लोकांना नुकसान सोसावे लागत असून अशा लोकांमध्ये जोधपूरमध्ये केबल व्यवसायी शांती स्वरूप शर्मा सुद्धाही सामील आहे.

नोटांच्या सीरिजच्या शेवटी ७८६ अंकांच्या नोटांचा संग्रह करण्याचा छंद शांती स्वरूप यांना होता. मागील अनेक वर्षापासून ते छोट्या-मोठ्या नोट ज्यांच्या शेवटी ७८६ अंक आहे त्या नोटांचा संग्रह करत होते. व्यवसाय करताना जेव्हा त्यांच्या हातात एखादी नोट येते त्यावेळी सर्वात आधी ते नोटांचा नंबर पाहात असतात व ज्या नोटांच्या शेवटी ७८६ अंक आहे त्या सर्व नोटा ते जमा करतात.

अशा प्रकारे शांती स्वरूप यांनी साडे सात लाख रुपये जमा केले आहेत. त्यामध्ये साडे चार लाख रुपये ५०० आणि हजार रुपयांच्या नोटांचे आहेत. शांति स्वरूप यांचे म्हणणे आहे की, नोटबंदीमुळे त्यांची अनेक वर्षाची मेहनत वाया गेली आहे. त्यांना या नोटा बँकेत जमा कराव्या लागणार आहेत. यामध्ये त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. ते त्यांच्या व्यवसायामुळे इतकी मोठी रक्कम बँक खात्यात जमा करू शकतात. शांति स्वरूप यांनी म्हटले आहे की, नोटबंदीमुळे त्यांचा छंद संपला नाही. ते आता नव्या नोटांमध्ये ७८६ नंबरच्या नोटांचा शोध घेतील व त्यांचा संग्रह करतील.

Leave a Comment