घरबसल्या कुठल्या एटीएममध्ये आहे रोकड ते समजणार

atm
नोटाबंदीमुळे एटीएम समोर नागरिकांच्या रांगा लागत आहेत मात्र नव्या नोटांच्या टंचाईमुळे एटीएममधील नोटा संपण्याचे प्रमाणही मोठे आहे.परिणामी नंबर लागेपर्यंत एटीएममधील पैसे संपल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. त्यावर घरबसल्याच कोणत्या एटीएम मध्ये पैसे आहेत हे जाणून घेण्यासाठी कॅश मॅनजेमेंट अॅन्ड पेमेंट सोल्युशन्स डेव्हलपर या कंपनीने एक खास सोय उपलब्ध करून दिली आहे. या कंपनीकडे बहुतेक बँकांचे एटीएम मॅनेज करण्याचे काम आहे.

वेबसाईटवर गेल्यानंतर देशाच्या बहुतेक भागातील एटीएम संबंधी माहिती येथे उपलब्ध आहेच त्याबरोवर राज्य, जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर एटीएम मधील पैशांची स्थितीही समजू शकणार आहे. ही वेबसाईट वापरणार्‍यांच्या संख्येत अल्पावधीतच वाढ झाली असल्याचेही दिसून येत आहे. याचबरोबर सोशल मिडीयावरही त्याबाबत लाईव्ह माहिती दिली जात आहे. फेसबुक व ट्विटरवर वर्कींग एटीएम, एटीएम वुईथ कॅश, एटीएम नियर यू या हॅशटॅगवर ही माहिती मिळते आहे. गुगल शीटवर रियल टाईम एटीएम ट्रॅकरवर गोव्यातील एटीएम, त्यातील पैसे देणारी कोणती याची माहिती दिली गेली आहे.

Leave a Comment