रेनॉल्टची ऑटोमॅटिक ‘क्विड’ लाँच

kwid
नवी दिल्ली: ऑटोमॅटिक ‘क्विड’ कार कार मेकिंग कंपनी रेनॉल्टने लाँच केली असून ४.२५ लाख ऐवढी क्विड एएमटी (ऑटोमॅटेड मॅन्युल ट्रन्समिशन) व्हेरिएंटची किंमत आहे. १.० लीटर इंजिन असणाऱ्या व्हेरिएंट आरएक्सटी (ओ) मध्ये उपलब्ध आहे. स्टॅंडर्ड मॅन्युअल मॉडेलपेक्षा ही कार फक्त ३०,००० रुपयाने महाग आहे.

मारुतीच्या ऑल्टो के १०शी क्विडच्या या नव्या कारची स्पर्धा असणार आहे. ऑल्टो के १०एजीएसची किंमत ४.०५ लाख एवढी आहे. क्लच फ्री ड्रायव्हिंग अशी क्विडची या नव्या कारची खासियत आहे. गिअर ट्रान्समिशनशिवाय कारच्या लूकमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या कारचे इंटिरिअर देखील पूर्वीप्रमाणेच आहे. फक्त गिअर बॉक्सऐवजी डॅशबोर्ड रोटरी डायल देण्यात आले आहे. या कारमध्ये टचस्क्रिन ऑडिओ-नेव्हिगेशन सिस्टम, डिजिटल स्पीडोमीटर, एसी आणि फ्रंट विंडोचा समावेश आहे.

Leave a Comment