बेझल फ्री डिस्प्लेसह येणार आयफोन एट?

bezal
आयफोन सेव्हन व प्लस ला जगभरातून मिळालेल्या संमिश्र प्रतिसादानंतर अॅपलने आयफोन आठ बाजारात आणण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बार्कले रिसर्च अॅनालिस्टच्या मते अॅपलचे नवे आयफोन बेझल फ्री( म्हणजे बॉर्डर नसलेले) व कर्व्ह ग्लास डिस्प्लेसह येतील.

आयफोन सेव्हन बाजारात येण्यापूर्वीही त्याचे फिचर्स काय असतील याचे अनेक तर्क लढविले गेले होते तेच आता आयफोन एट बाबतही घडते आहे. अॅनालिस्टच्या म्हणण्यानुसार आयफोन एट ५ इंची व ५.८ इंची स्क्रीन सह येतील व त्याचे डिझाईन बेझ/>लफ्री असेल. यामुळे या आयफोनमध्ये होम बटण काढले जाईल. बेजल फ्री डिझाईनचा मुख्य फायदा म्हणजे फोनचा स्क्रिन चारी बाजूंनी अधिक मोठा दिसेल हा आहे.

Leave a Comment