पोर्शेची मॅकन आर फोर एसयूव्ही भारतात आली

porsche
पोर्शने त्यांच्या भारतातील सर्वात कमी किमतीच्या मॅकनचे चौथे व्हेरिएंट मॅकन आर फोर भारतात सादर केले आहे. या एसयूव्हीची किंमत आहे ७६.८४ लाख रूपये. एस डिझेल, टर्बो नंतरचे हे मॉडेल आहे.

या एसयूव्हीला २.० लिटरचे चार सिलींडर पेट्रोल इंजिन दिले गेले असून ही कार ० ते १०० किमीचा वेग ६.७ सेकंदात गाठते. कारचा टॉप स्पीड आहे ताशी २२९ किमी. ऑटो क्लायमेट कंट्रोल सिस्टीम, व्हॉइस रेकगनिझेशन, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, ७ इंची पोर्शे कम्युनिकेशन मॅनजेमेंट टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. या एसयूव्हीची ड्रायव्हरसीट इलेक्ट्रीकली आठ प्रकारांनी अॅडजस्ट करता येते. क्रूझ कंट्रोल, पॉवर्ड टेलगेट, दिवसा लागणारे एलईडी व मल्टी फंक्शन स्टीअरिंग व्हील या कारला दिले गेले आहे.

Leave a Comment