‘एसबीआय’च्या बुडीत खात्यात जमा माल्ल्याचे कर्ज

vijay-mallya
मुंबई : सामान्य नागरिक देशात नोटाबंदीमुळे रांगामध्ये तात्कळत आहेत. तर दुसरीकडे विजय माल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईने घेतलेले १२०१ कोटी रुपयांचे कर्ज भारतीय स्टेट बँकेने बुडीत खात्यात जमा केले आहे. ३० जून २०१६ रोजी हे कर्ज बुडित खात्यात जमा करण्यात आले आहे. बँकिंगच्या क्षेत्रात या प्रक्रियेला ‘राईट ऑफ’ करणे असे म्हटले जाते.

जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत एकूण ४८ हजार कोटींची कर्ज एसबीआयने ‘राईट ऑफ’ केली. त्यात विजय माल्ल्याचे नाव सर्वात वर आहे. याबाबत वृत्तपत्र ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार किंगफिशर एअरलाईन, केएस ऑईल, सुर्या फार्मास्युटिकल, गेट इंजिनिअरिंग कंन्स्ट्रक्शन आणि साई इन्फो सिस्टिम अशी पहिल्या पाच कर्ज बुडव्या कंपन्यांची नावे आहेत.

Leave a Comment