१ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प ?

budget
नवी दिल्ली: आगामी सर्वसमावेशक अर्थसंकल्प आता एकत्रच सादर केले जाणार असून पुढील वर्षी १ फेब्रुवारी २०१७ रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या वेळापत्रकानुसार नेहमीपेक्षा सुमारे १५ दिवस आधी सुरू होणार असल्याचा अंदाज आहे. जानेवारीमध्ये संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. ८२ वर्षानंतर प्रथमच एकत्र बजेट सादर होणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होत होते. २५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प, २६ तारखेला आर्थिक सर्वेक्षण आणि २८ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्याची रीत अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र, जीएसटीची अंमलबजावणी १ एप्रिल २०१७ पासून करावयाची असल्याने त्याआधीच अर्थसंकल्प संमत होणे आवश्यक आहे, म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान एक महिना अगोदर आणण्याचे आणि अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते.

रेल्वे अर्थसंकल्पाचे सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये विलिनीकरण झाल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्पीय सादर करण्यात येणार आहे. आतापर्यंत रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प वेगवेगळे मांडण्याची प्रथा चालत आली आहे. परंतु यावेळी हे दोन्ही अर्थसंकल्प विलीन करून एकत्रित सादर केले जाणार आहे.

Leave a Comment