बँकांमध्ये आज लागणार चार रांगा

bank
मुंबई – आज देशभरातील सर्व बँका गुरूनानक जयंती या एका दिवसाच्या सुट्टीनंतर उघडल्या असून एक दिवस बँक बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्यामुळे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. बँका आज उघडणार असल्याने मुंबईत विविध ठिकाणी स्थानिकांनी पहाटेपासूनच रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर त्या बदलून घेण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून बँकासमोर स्थानिकांची गर्दी आहे.

बँकांबाहेर होणारी गर्दी पाहता यापुढे चार रांगा लावण्यात येणार आहेत. पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी, दिव्यांगांसाठी आणि वयोवृद्ध व्यक्तींसाठी असं या रांगांचे स्वरुप असणार आहे. या अगोदर एटीएममधून २ हजार रुपये काढता येत होते. मात्र आता एटीएममध्ये २५०० रुपये काढता येऊ शकतात. मात्र प्रत्येक एटीएममध्ये ही सुविधा अद्याप उपलब्ध नाही. तर बदल झालेल्या एटीएम मधूनच २५०० रु. काढता येणार आहेत. एटीएममध्ये बदल करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असून २ लाख बँक कर्मचारी त्यासाठी काम आहेत. दरम्यान, गरज नसताना बँकांमध्ये गर्दी करु नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment