पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

petrol
मुंबई – पेट्रोल आणि डिझेलच्या भावात कपात करण्यात आली असून पेट्रोलच्या किंमतीत १ रूपया ४६ पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत १ रूपया ५३ पैशांनी कपात करण्यात आल्यामुळे नागरिकांना थोडा का होईना दिलासा नक्की मिळणार आहे.

पेट्रोलच्या किमतीत १४ पैशांनी तर डिझेलच्या किमतीत १० पैशांनी गेल्या ४ ऑक्टोबरला वाढ करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंपावर चांगलाच गोंधळ उडत आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. तसेच लोकांकडे पैसे नसल्याने लोक पेट्रोलही भरू शकत नाही. अशात पेट्रोलची कमी झालेली किंमत नागरिकांना दिलासा देणारी आहे.

Leave a Comment