पाच दिवसांत एसबीआयमध्ये जमा झाले ८३,७०२ कोटी रुपये

sbi
मुंबई : ५०० आणि १०००च्या नोटांवर केंद्र सरकारने बंदी आणल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेत पाच दिवसांत तब्बल ८३७०२ कोटी रुपये जमा झाले आहेत.

याबाबत एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, १० ते १४ नोव्हेंबरच्या पाच वाजेपर्यंत ४१४६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलल्या आहेत. सोमवारी गुरुनानक जयंतीमुळे अनेक राज्यातील बँका बंद होत्या. मात्र पूर्वेतील काही राज्यांमध्ये बँका सुरु असल्याने तेथे नोटा जमा करण्यास लोकांची गर्दी होती. गेल्या पाच दिवसांत बँकांच्या विविध शाखांमध्ये ५ तब्बल ८३७०२ कोटी रुपयांच्या ५०० आणि १०००च्या नोटा जमा झाल्या आहेत. याआधी काल भारतीय बँक संघाने म्हटले होते की गेल्या तीन दिवसांत बँकांनी ३०००० कोटी रुपयांच्या दोन हजार रुपये आणि इतर नोटा वितरित केल्या आहेत.

Leave a Comment