गुगलचे पिक्सल फोन १ मिनिटांत हॅक

piksel
गुगलच्या पिक्सल सिरीजमधील स्मार्टफोन केवळ १ मिनिटांत हॅक करण्यात हॅकर्सना यश आले असून त्या बद्दल गुगलने या टीमला १,२०००० डॉलर्स रोख रकमेचे बक्षीस दिले असल्याचे समजते. व्हाईट हॅट नावाच्या हॅकर्स टीमने ही कामगिरी बजावली असून ही टीम चायनीज सिक्युरिटी सॉफ्टवेअर कंपनी क्यूहू ३६० चा भाग असल्याचेही समजते. गुगलने त्यांच्या नव्या पिक्सल सिरीजतर्फे सादर केलेले दोन स्मार्टफोन हॅक करता येणार नाहीत असा दावा यापूर्वी केला होता.

गुगलने २०१६ हॅकींग स्पर्धांचे आयेाजन नुकतेच केले होते त्यात गुगलचा नवा पिक्सल एक्सएल फोन १ मिनिटांत हॅक केला गेला. गुगलने सप्टेंबरमध्ये हॅकींग चॅलेंज या नावाने स्पर्धा भरविली होती. द प्रोजेक्ट झिरो प्राईस या नावाने आयेाजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत नेक्सस सिक्स पी व नेक्सस फाईव्ह एक्स यातील अॅंड्राईड डिव्हाईसमधील सारे कोड, फोन नंबर व ईमेल हॅक करायचे होते.

Leave a Comment