एटीएममधून मिळणार ५०, २० रुपयांच्या नोटा

arundhati-bhattachary
नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर होणा-या अडचणी कमी करण्यासाठी देशभरातील एटीएम मशिन्समध्ये लवकरच १०० रुपयांच्या नोटांबरोबरच ५० आणि २० रुपयांच्या नोटा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

सर्वसामान्यांना नव्या दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा मिळण्यासाठी मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या त्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी असंख्य टेक्निकल एक्सपर्ट काम करत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आजपासून दोन हजार रुपयांच्या नोटा मिळणार आहेत. तसेच नागरिकांची गर्दी कमी झाल्यानंतर देशातील एटीएम मशिन्समध्ये २० आणि ५० रुपयांच्या नोटा वितरीत करण्यात येणार असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले.

Leave a Comment