२० हजार कोटी रूपयांची संपत्ती दान करणार सौदीचा प्रिन्स

alwalid-bin-talal
नवी दिल्ली – ३२ बिलियन डॉलर म्हणजेच २० हजार कोटी रूपयांची संपत्ती दान करण्याचा निर्णय नुकताच अलवलीद बिन तलालने घेतला आहे. जगातल्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत सौदी अरबचे वॉरेन बफेट नावाने लोकप्रिय असलेले प्रिन्स अल वलीद बिन तलाल ३४व्या स्थानावर आहेत. एवढेचच नाहीतर २००८ मह्द्ये टाईम्स मॅगझिनने त्यांना १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीतही स्थान दिले होते.

सौदी रॉयल फॅमिलीतून असणारे तलाल किंगडॉम हॉलीडे कंपनीचे मालक आहेत. ही एक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. तलाल यांची ही कंपनी बॅंकिंग आणि अर्थ सेवा, हॉटेल, मास मिडिया, मनोरंजन, कॄषी, रिअल इस्टेट या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करते. फेसबुक, अ‍ॅप्पल्सहीत अनेक कंपन्यांमध्ये भागीदर असलेल्या तलालकडे ३०० लक्झरी गाड्य़ांचा ताफा आहे. तीन मोठे महल. ४२० रूम्सचा एक महल ज्यात तलाव आणि प्राणी संग्रहालय सुद्धा आहे.

सौदी अरबचे चर्चेतील नाव प्रिन्स तलाल यांचा मुलगा अल वलीद बिन तलाल याच्याकडे जगातले सर्वात महाग विमान आहे. याला उडता महल म्हटले जाते. २१.३ अरब रूपयात एअरबसकडून विकत घेण्यात आलेले हे विमान सर्व सुखसोयींनी युक्त आहे. यात पाच मोठ्या रूम्स असून तुर्की शैलीतील न्हानीघर, एक रॉल्स रॉयस कार ठेवण्याची जागा आणि मिटिंग रूम आहे.

६० वर्षीय तलालने तीन लग्न केले आहेत. त्याची शेवटची पत्नी ३१ वर्षीय अमीरा अल तवील ही आहे. तिला त्याने २०१३ मध्ये तलाक दिला होता. वॉरेन बफे, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग आणि मायकल ब्लूमबर्गसारखे श्रीमंत जे दानशूर म्हणूनही लोकप्रिय आहेत त्यांच्या यादीत तलाल याचही नाव आहे.

Leave a Comment