२.५० लाखात विकले हिटलरच्या पत्नीचे अंतर्वस्त्र

hitler
नवी दिल्ली – आजही नाझी हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर याच्याशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा होत असतो. अनेक मोठमोठे किस्से या व्यक्तीचे आजही अनेकांना चक्रावून सोडतात. नेहमीच त्याचे पसर्नल आयुष्यही चर्चेत राहिले. त्याची पत्नी इवा ब्राऊनही नेहमीच चर्चेत असते. हिटलरची पत्नी इवा ब्राऊनचे निळ्या रंगाच्या अंतर्ववस्त्रांचा नुकताच लिलाव करण्यात आली आणि या एका निळ्या निकरला ३ हजार पौंड म्हणजे साधारण अडीच लाख रूपये ऐवढी किंमत मिळाली.

लिलावामध्ये किती किंमत मिळेल याचा जितका अंदाज लावला होता, मिळालेली रक्कम ही त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. या संग्रहालयात रन्तजडित अंगठ्या, चांदीचा आरसा लावलेला बॉक्स आणि चांदीचा बॉक्स ज्यात अजूनही ब्राऊनची लिपस्टीक ठेवली आहे. हे सर्व ब्रिटनच्या एका खाजगी संग्रहकर्ताने खरेदी केले आहे. या निकरबाबत सांगण्यात आले आहे की, या निकरवर लेस आणि रिबन लागली आहे आणि यावर ब्राऊनच्या नावाचे पहिले अक्षर लिहिण्यात आले आहे. बीबीसी न्य़ूजनुसार, सोन्याच्या अंगठीत दूधिया रंगांच्या रत्नासह आजूबाजूला सहा मानिक लावले आहेत. ते १,२५० पौंडला विकले गेले. चांदीच्या लिपस्टीक केस ज्यावर ईबी लिहिले आहे ते ३६० पौंडला विकले गेले.

Leave a Comment