बीएमडब्ल्यू ची जीथ्री टेन आर सुपरबाईक

bmwbike
सुपरबाईक प्रेमींसाठी बीएमडब्ल्यू स्वस्त आणि मस्त बाईक भारतात सादर करत असून ही बाईक २०१७ च्या सुरवातीस भारतीय बाजारात येईल असे जाहीर केले गेले आहे. रॉयल एनफिल्डच्या रेंजमधील ही बाईक भारतीय ग्राहकांसाठी दोन लाख रूपयांत उपलब्ध केली जाणार आहे. भारतीय बाजाराच्या हिशोबानेही ही किंमत ठरविली गेल्याचे समजते.

या बाईकला ३१३ सीसीचे इंजिन दिले गेले आहे. ही बाईक नेहमीच्या रस्त्यावर प्रतिलिटर ३० किमीचे तर हायवेवर ३५ किमी मायलेज देईल. बाईकचा लूक अतिशय देखणा आहे व तिचा टॉप स्पीड आहे ताशी १७० किमी. बाईकला दोन चॅनल एबीएस सिस्टीम तसेच सिक्स स्पीड मॅन्यूअल ऑटो ट्रान्समिशन दिले गेले आहे. हे मॉडेल सिंगल सिलेंडर फोर स्ट्रोकचे आहे. बाईकचे वजन आहे १५८ किलो.

Leave a Comment