एसबीआयची १ हजार एटीएम पूर्णपणे कार्यरत

state-bank
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय सोमवार रात्रीपासून १ हजार एटीएम पूर्णपर्ण कार्यरत करत असल्याचे बँकेच्या अध्यक्षा अरूंधती रॉय यांनी स्पष्ट केले असून उर्वरित एटीएम पूर्णपणे कार्यरत करण्यासाठी बँक कर्मचारी कसून प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या सोमवारी रात्रीपासून आमच्या १ हजार एटीएम मधून २ हजार व ५०० रूपयांच्या नव्या नोटा ग्राहकांना मिळू शकणार आहेत. त्यासाठी करावयाचे सर्व बदल पूर्ण झाले आहेत.

सध्या एसबीआयच्या एटीएम मधून १०० रूपयांच्या नोटाच मिळत आहेत. एका एटीएम मध्ये अशा २५०० नोटा मावतात त्यामुळे १२५ लोकांनी नोटा काढल्या तर एटीएम मधील नोटा संपतात असेही त्यांनी सांगितले. अ्रर्थात सर्व एटीएम लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment