बद्रीनाथ मंदिर शीतकालासाठी बंद

badri
परंपरेप्रमाणे चार धाम यात्रेतील गंगोत्री, जमुनोत्री, केदार व बद्रीनाथ मंदिरे शीतकालासाठी बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून १६ नोव्हेंबर रोजी ब्रदीनाथ कपाट बंद केले जाणार आहे. त्याची सुरवात १२ नोव्हेंबरपासूनच झाली असून या दिवशी सर्वप्रथम गणेश मंदिराचे कपाट बंद करण्याचा विधी पार पडला. सकाळपासूनच या मंदिरात अभिषेक, महाभिषेक, पूजा विधी झाले व वेद मंत्रोच्चारात गणेश पूजा करण्यात आली.

परंपरेप्रमाणे पूजा अर्चा झाल्यानंतर सायंकाळची आरती होऊन प्रार्थना मंडपातील शीतकालीन निवासाच्या जागी गणेशाची प्रतिमा विराजित करण्यात आली. या चारही धामांमध्ये थंडीच्या काळात मुख्य मंदिरे बंद केली जातात कारण हा सर्व भाग बर्फाने आच्छादला जातो. त्यामुळे येथील देवांना खाली कमी उंचीवर असलेल्या शीतकालीन निवासस्थानात हलविले जाते. त्यानंतर अक्षय्य तृतीयेला पुन्हा कपाटे म्हणजेच मंदिराचे दरवाजे उघडले जातात व देवांना पुन्हा मुळ स्थानी नेले जाते. वर्षानुवर्षे ही परंपरा चालू आहे.

Leave a Comment