नवी तगडी ऑडी आरएस ७ परफॉर्मन्स भारतात

audi-rs7
लग्झरी कार निर्माती जर्मन कंपनी ऑडीने शुक्रवारी त्यांची नवी ऑडी आरएस सेव्हन परफॉर्मन्स कार भारतात लाँच केली आहे. या गाडीची किंमत दिल्ली एक्स शो रूम १.६ कोटी रूपये आहे.

या तगड्या व देखण्या कारसाठी ४.० लिटरचे टीएफएसआय बाय टर्बो व्ही एट इंजिन दिले गेले आहे. या इंजिनची क्षमता ३९९३ सीसी इतकी आहे. पॉवरफुल ड्रायव्हिंगसाठी या कारची व्हील्स २१ इंचांची आहेत व ० ते १०० किमीचा वेग ही कार ३.७ सेकंदात घेते. कारचा टॉप स्पीड आहे ताशी ३०५ किमी.

Leave a Comment