एटीएम कॅलिब्रेशनसाठी बँकांना १५९३ कोटी रूपयांचा खर्च

cassett
पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर एटीएम पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठी पंधरा दिवस ते तीन आठवडे लागतील असे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केले असले तरी तज्ञांच्या मते ही एटीएम कार्यरत होण्यास महिन्यापेक्षाही अधिक कालावधी लागणार आहे. कारण नोटांचा साईज बदलला असल्याने मशीनमधील कॅसेट ट्रे कॅलिब्रेट करावे लागणार आहेत व हे मोठे आव्हान आहे. देशात २ लाख १८६१ एटीएम मशीन्स आहेत व प्रत्येक मशीनसाठी तीन ट्रे बदलावे लागणार आहेत. याचाच अर्थ सहा लाखांपेक्षा अधिक कॅसेट ट्रे बदलणे भाग पडणार आहे. हे ट्रे बदलण्यासाठी बँकांना १५९३ कोटी रूपये खर्च करावे लागणार आहेत.

एटीएममध्ये नोटांच्या आकारानुसार कॅसेट ट्रे बसविलेले असतात.१००,५०० व हजाराच्या नोटांसाठी वेगवेगळे ट्रे असतात. पैसे काढण्यासाठी गाहकांने एटीएम वापरले की सेन्सरशी जोडलेली ही मशीन्स मेन सर्व्हर रूमशी जोडली जातात. त्यानंतर सर्व्हर स्विच रूमकडून सॅटेलाईट मेसेजिंगच्या सहाय्याने सेन्सर डिस्पेन्सिंग मशीनला कोणत्या नोटा द्यायच्या याची सूचना देतो व फिडींग व्हॅल्यू नुसार कॅसेट ट्रे त्या त्या मूल्याच्या नोटा देतात. नव्या नोटांचे आकार बदलले असल्याने प्रत्येक एटीएममधील तीन ट्रे बदलणे, सेन्सर सेटींग करणे, सॅटलाईट सेटींग करणे अशी कामे नव्याने करावी लागणार आहेत. त्यानंतर तीन दिवस टेस्टिंग साठी लागतील व मशीन्स व्यवस्थित चालत आहेत याचे परीक्षण पूर्ण झाल्यानंतर ती ग्राहकांसाठी खुली गेली जातील. या सर्व कामांना महिन्यापेक्षाही अधिक अवधी लागणार आहे.

Leave a Comment