सोन्याच्या किंमती पुन्हा मूळपदावर

gold
मुंबई: नोटाबंदीच्या निर्णयानंतर सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने अचानक वाढलेल्या सोन्याच्या किंमती आता मूळ पदावर आल्या आहेत. मागील दोन दिवसात ३० हजार रुपये प्रति तोळावरून ३४ हजारावर गेलेले सोने पुन्हा ३० हजारांवर आले आहे.

बनावट नोटा आणि काळ्या पैशावर प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने भारतीय चलनातून ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर या नोटा जिरविण्यासाठी अनेकांनी सराफांकडे धाव घेतली. त्यामुळे सोन्याच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली.
त्याचप्रमाणे सरकारने अचानक जाहीर केलेल्या या निर्णयामुळे चलनाच्या स्थैर्याबद्दल निर्माण झालेल्या भीतीनेही अनेकांनी सोने विकत घेण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत थेट ४ हजारांची वाढ झाली.

मात्र नोटाबंदीच्या निर्णयानंतर दोन दिवस ठप्प असलेले बँक व्यवहार रखडत हा होईना; पण सुरू झाले आणि अल्प प्रमाणात का होईना; नवीन नोटा उपलब्ध होऊ लागल्याने सोन्याच्या दरातील ही सूज उतरली असून सोने आता पुन्हा मूळ दरात उपलब्ध होऊ लागले आहे.

Leave a Comment