मारूतीच्या नव्या स्विफ्ट स्पोर्टीला दोनच दरवाजे

swift
मारूती सुझुकी लवकरच त्यांचे स्विफ्टचे नवे मॉडेल बाजारात आणत असून या कारला स्पोर्टी लूक दिला गेला आहे. ४० हून अधिक देशांतून या मॉडेलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही समजते. या कारचे इंजिन अधिक दमदार म्हणजे १५८६ सीसीचे आहे. विशेष म्हणजे कारला अधिक स्पोर्टी बनविण्यासाठी तिला दोनच दरवाजे दिले गेले आहेत. डिसेंबर २०१६ मध्ये ती बाजारात दाखल होईल.

या कारला चार सिलींडर व्हीव्हीटी पेट्रोल इंजिन दिले गेले आहे व सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनही दिले गेले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ती अधिक चांगली असून ७ एअरबॅग्जच्या सहाय्याने ती परिपूर्ण केली गेली आहे. त्याशिवाय इलेक्टॉनिक स्टॅबिलीटी प्रोग्रॅम, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम अ्रसलेली ही हचबॅक कार आहे. तिची किंमत अंदाजे आठ लाख रूपये असेल असे समजते.

Leave a Comment