एचटीसीचा बोल्ट स्मार्टफोन लाँच

htc
एचटीसीने स्प्रिंट सहकार्याने तयार केलेला बहुप्रतिक्षित हाय एंड स्मार्टफोन बोल्ट नुकताच लाँच केला आहे. शुक्रवारपासून हा फोन स्प्रिंट स्टोअरसह कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवरही विक्रीसाठी उपलब्ध केला गेला आहे. मासिक हप्त्यानेही हा फोन विकत घेता येणार असून त्यासाठी ग्राहकाला २५ डॉलर्स प्रतिमहिना असे २४ हप्ते भरावे लागतील. फोनची किंमत ६०० डॉलर्स म्हणजे अंदाजे ४०२५० रूपये आहे.

कंपनीने या स्मार्टफोनचे प्रमोशन करताना तो अधिक तेज म्हणजेच वेगवान असल्याचे सांगितले आहे. या फोनला ५.५ इंची क्यूएचडी डिस्प्ले, अँड्राईड नगेट ७.० ओएस, स्नॅपड्रगन ८१० प्रोसेसर, ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज ते २ टीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझरसह १६ एमपीचा रियर कॅमेरा, ८ एमपीचा फ्रंट स्क्रीन फ्लॅशसह फ्रंट कॅमेरा व किवक चार्जिंग टेक्नॉलॉजीची ३२०० एमएएच बॅटरी दिली गेली आहे. हा कंपनीचा पहिलाच वॉटर रेझिस्टंट अॅल्युमिनियम बॉडी फोन असून तो धूळप्रतिबंधकही आहे. गुगल फोटो अॅपवर अनलिमिटेड फोटो स्टोरेज मोफत करण्याची सुविधाही दिली गेली असून डिस्प्ले खालीच फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे.

Leave a Comment