येथे कारंज्यातून उडते रेड वाईन- पर्यंटकांना मोफत घेता येतो आस्वाद

redwine
जगभरात विविध ठिकाणी अनेक प्रकारची कारंजी पाहायला मिळतात. पाण्याचे थंडगार तुषार उडविणारी कारंजी दमल्या जीवाला शांती देतातच पण मनाला आनंदही देतात. कारंजे म्हटले की ते पाण्याचे असणार असे कुणीही सांगेल. पण जगात असेही एक कारंजे आहे जे कुणी कधी ऐकले नसेल. हे कारंजे आहे रेड वाईनचे

इटालीतील रोमच्या अबसज्जा या पर्यटनस्थळी हे कारंजे बसविले गेले आहे व त्यातून चोवीस तास रेड वाईन मिळते. येथे येणार्‍या पर्यटकांना किंवा व्हिजिटर्सना या कारंजातील वाईनचा आस्वाद फ्रीमध्ये घेता येतो. कँटीना डोरा सर्चेस तर्फे हे कारंजे खास टूरिस्टसाठीच बनविले गेले आहे. याच ठिकाणी एक सिंकही बसविले गेले आहे व त्यात नळातून रेड वाईन येते. कोणत्याही वेळी व कितीही प्रमाणात या कारंजातील व नळातील वाईन व्हिजिटर्स पिऊ शकतात तीही एकही पैसा न मोजता. याच भागात एक झराही आहे व त्यातूनही रेड वाईनच वाहते. अर्थात हे कांही पहिलेच वाईन फौंटन नाही यापूर्वीही रोममध्ये वाईन फौंटन उभारली गेली होती असेही समजते.

Leave a Comment