आयफोनच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी

seven
भारतीय बाजारात नवा आयफोन सेव्हन व त्यातही सेव्हन प्लसची मागणी पूर्ण करण्यात अॅपलला यश आलेले नाही. आयफोन सेव्हन प्लस हा सर्वात महाग आयफोन आहे मात्र त्यालाच भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक मागणी आहे. या फोनचा मोठा स्क्रीन ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. दिवाळीसाठी अॅपलने रेकार्ड शीपमेंट केली होती तरीही आयफोनचा पुरवठा मागणीच्या तुलनेत खूपच कमी होत असल्याचे शॉपर्सचे म्हणणे आहे.

सॅमसंग नोट सातला झटका बसल्यानंतर अॅपल सेव्हनसाठी ग्राहकांचा प्रतिसाद एकदम वाढला आहे. मात्र अॅपलकडून पुरवठा वाढविला गेला नाही तर सॅमसंगच्या अनुपस्थितीचा पुरेसा फायदा अॅपल उठवू शकणार नाही असेही सांगितले जात आहे. जानेवारीपर्यंत तरी परिस्थितीत सुधारणा होणार नाही असेही समजते कारण नोव्हेंबर डिसेंबर हा अमेरिकेत सुट्ट्यांचा काळ आहे व अमेरिकेतून शिपमेंट होईल तेव्हाच भारतात आयफोनचा पुरवठा वाढू शकणार आहे. अॅपलने आक्टोबरमध्येही २ लाख युनिट भारतात पाठविली होती मात्र त्यात सेव्हन प्लसची संख्या अवघी ५६ हजारच होती असेही अॅपल विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सेव्हन प्लसमध्ये गोल्ड, रोजगोल्ड व सिल्व्हर रंगाचे फोन तर आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत.

Leave a Comment