आजही एटीएम सुरू न झाल्याने नागरिक निराश

atm
पुणे – ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा मोदी सरकारने रद्द केल्यानंतर आज एटीएम सुरू होणार होती.त्यामुळे सकाळपासूनच एटीएमवर ग्राहकांनी गर्दी केली. मात्र एटीएम बंद असल्याने अनेकांची गैरसोय झाली.

आज एटीएम सुरू होणार असल्याने बँकेत गर्दी करण्यापेक्षा एटीएममधून पैसे काढण्यासाठी सकाळी सकाळीच ग्राहकांनी सेंटर्सवर धाव घेतली. मात्र बहुतांश ठिकाणी एटीएम बंद असल्याने ग्राहकांना पैसे न घेताच परत फिरावे लागत होते. तर अजूनही पैसे न भरल्याने एटीएम बंद असल्याचे सांगण्यात येत होते. तर काही ठिकाणी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत पैसे भरले जातील. त्यानंतर एटीएम सुरू होतील असे सांगण्यात येत होते. एकूणच मोदींच्या घोषणेने लोकांची आजही तारांबळ उडणार असेच चित्र आहे. एटीएमचा पर्यायही आज जास्त काही करु शकेल अशी परिस्थिती नाही. कारण सेंटर्सच्या बाहेर सकाळपासूनच गर्दी होत असल्याने त्यातील पैसेही लवकरच संपतील मग काय असा प्रश्न दुपारपर्यंत पुन्हा निर्माण होणार अशीच चिन्हे आहेत.

Leave a Comment